ट्रेडिंग म्हणजे काय?कशी शिकावी? संपूर्ण माहिती | What is Trading in Marathi| All information about Trading

गेल्या एक वर्षात भारतात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढले आहे.मराठी माणसेही आता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.आज मी तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Trading in Marathi) असते त्याबद्दल ची माहिती सांगणार आहे. 

Trading म्हणजे काय? What is Trading? In marathi

ट्रेडिंग चा अर्थ आहे व्यापार.दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे ट्रेडिंग होय. फार जुन्या काळापासून ट्रेडिंग आपल्या समाजात सुरु आहे.वेळेनुसार त्याचे स्वरूप मात्र बदलले आहे.जुन्या काळात एक वस्तूच्या बदल्यात लोक दुसरी वस्तू घेत असत.त्यानंतर वस्तू च्या बदल्यात पैसे अशी पद्धत सुरू झाली.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग चा अर्थ शेअर ची खरेदी व विक्री करणे.आजच्या काळात आपण ऑनलाईन मोबाईल किंवा लॅपटॉप वरून ट्रेडिंग केली जाते.शेअर ट्रेडिंगमध्ये एखाद्या कंपनीतील शेअर्सची खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो.ऑनलाईन ट्रेडिंग साठी तुम्हाला डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ची गरज लागते.

 

Trading चे प्रकार| Types of Trading in marathi

 

इंत्रा डे ट्रेडिंग | Intraday Trading in Marathi

इंत्राडे ट्रेडिंग म्हणजे ज्या दिवशी शेअर खरेदी केला आहे त्याच दिवशी मार्केट बंद व्हायच्या आत शेअर विकणे.ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म द्वारे इंट्रा डे ट्रेडिंग केली जाते.समजा जेव्हा सकाळी मार्केट ओपन झाले तेव्हा Abc कंपनी ची शेअर ची किंमत 1000 रुपये होती आणि तुम्ही 10000 रुपयांचे 10 शेअर विकत घेतले.आणि काही तासांनंतर एक शेअर ची किंमत 1000 वरून 1100 झाली आणि तुम्ही घेतलेले 10000 रुपयांचे शेअर विकले. म्हणजे तुम्हाला 1 शेअर मागे 100 रुपये असे 10 शेअर मागे 1000 रुपयांचा नफा झाला. इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये असाच नफा कमावला जातो.पण यामध्ये तुम्हाला नुकसान होण्याचीही शक्यता असते.

 

डिलिव्हरी ट्रेडिंग | Delivery Trading in Marathi

डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकदाराला एकाच दिवशी शेअर खरेदी आणि विक्री करता येत नाही. डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदार हा शेअर्स आपल्या इच्छेनुसार जास्त कालावधीसाठी ठेवू शकतो.तो कालावधी दोन दिवसांपासून दोन वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षांपर्यंत असू शकतो.यालाच डिलिव्हरी ट्रेडिंग असे म्हणतात. डिलिव्हरी ट्रेडिंग साठी तुम्हाला डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ची गरज लागते.डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये इन्त्रा डे ट्रेडिंग पेक्षा कमी जोखीम असते.

समजा तुम्ही PQR कंपनीचे शेअर खरेदी केले.तुम्ही खरेदी करून झाल्यानंतर, T+2 दिवसांनंतर शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात. तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये शेअर जमा होण्याच्या या कृतीचा शेअर्सची डिलिव्हरी असे म्हटले जाते.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग चा अर्थ शेअर ची खरेदी व विक्री करणे.आजच्या काळात आपण ऑनलाईन मोबाईल किंवा लॅपटॉप वरून ट्रेडिंग केली जाते.शेअर ट्रेडिंगमध्ये एखाद्या कंपनीतील शेअर्सची खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो.ऑनलाईन ट्रेडिंग साठी तुम्हाला डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ची गरज लागते.

 

स्काल्प ट्रेडिंग | Scalp Trading in Marathi

स्कॅल्प ट्रेडिंग, किंवा स्कॅल्पिंग, ही एक ट्रेडिंग स्त्रेटर्जी आहे जी खूप काळापासून आहे.स्कॅल्प ट्रेडिंग पद्धतीमध्ये,गुंतवणूकदार एका दिवसात अनेक वेळा थोड्या नफ्यासाठी स्टॉकची खरेदी आणि विक्री करतात.स्कॅल्प ट्रेडिंग करणारे गुंतवणूकदार स्कॅल्पर म्हणून ओळखले जातात.

 

पोझिशनल ट्रेडिंग | Positional Trading in Marathi

तुम्हाला शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करायची आहे पण शेअर मार्केटच्या रोजच्या उतार, चढावावर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा वेळ नाही आहे तर पोझिशनल ट्रेडिंग हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो.

पोझिशनल ट्रेडिंग मध्ये ट्रेडर्स हे इंत्रडे ट्रेडिंग पेक्षा जास्त काळ शेअर होल्ड करू शकतात.ट्रेडर्स हे एक दिवस,एक आठवडा,एक महिना पर्यंत सुद्धा शेअर होल्ड करू शकतात.आणि नफा झाल्यावर शेअर विकू शकतात.यात तुम्हाला इंत्राडे ट्रेडिंग प्रमाणे एकाच दिवशी शेअर ची खरेदी व विक्री करण्याचे बंधन नाही.

 

स्विंग ट्रेडिंग | Swing Trading in Marathi

स्विंग ट्रेडिंग हा ट्रेडिंग चा एक प्रकार आहे ज्यामध्ये ट्रेडर्स अल्प कालावधीसाठी शेअर्स खरेदी करतो आणि त्यातून नफा मिळवतो. हा कालावधी सहसा काही दिवस ते अनेक आठवडे असू शकतो.

स्विंग ट्रेडर्स शेअरच्या किमतीतील उतार- चढाव आणि गतीचा ट्रेंड शोधण्यासाठी आणि त्यातून शेअर्सची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ट्रेडिंग पॅटर्नचे विश्लेषण करतात.

स्विंग ट्रेडिंग ही सामान्यतः लार्ज कॅप स्टॉकवर केले जाते. स्विंग ट्रेडिंग साठी शेअर निवडण्यासाठी टेक्निकल अनालिसिस चा वापर केला जातो. जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकावे लागेल.

Leave a comment