शेअर मार्केट चे बेसिक|Basic of Share Market

शेअर म्हणजे काय?|What is Share and basic of share market

बघा मित्रांनो,

आज मी तुम्हाला शेअर म्हणजे काय?  ते समजावून सांगणार आहे.

त्याकरिता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते , जेणेकरून शेअर म्हणजे काय? What is Share| हे अगदी सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा कळेल.

चार मित्र असतात, ज्यांची नावे A,B,C आणि D आहे. चारही जणांना स्वतः चा एक व्यवसाय चालू करायचा असतो; पण व्यवसाय चालू करायचा म्हटला कि त्याकरिता  भांडवल लागणारच ना, जर या चार मित्रांपैकी कुणी एकानी एखादा व्यवसाय चालू केलाच तर त्या एका व्यक्तीलाच पूर्ण रक्कम भरावी लागेल.

उदा: XYZ नावाचा व्यवसाय चालू करायला २,००,०००/- रु (दोन लाख ) रुपये लागणार आहेत पण त्या चौघांपैकी एकाहिकडे पूर्ण २,००,०००/- रु नाही आहेत, तर यावेळी त्यामधला एक मित्र बाकीच्या सगळ्या मित्रांना सुचवतो कि, आपण जर चौघांनी जर थोडे-थोडे पैसे गोळा केले तर आपण हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकतो.

 मग  ते चौघे मित्र मिळून ५०,०००/- _ ५०,०००/- रु जमवितात आणि त्यांचा व्यवसाय उभा राहतो. तर मित्रांनो हि झाली गोष्ट. तर आता बघा त्या चौघ मित्रांनी जमविलेल्या ५०,०००/-_५०,०००/- रु मिळून २,००,०००/- (दोन लाख) रुपये जमा होऊन एक रक्कम उभी राहिली त्या चौघांचे चार भाग पैसे म्हणजे,

  • A=५०,०००/-
  • B=५०,०००/-
  • C=५०,०००/-
  •  D=५०,०००/- …….असे हे चार भाग मिळून झाले २,००,०००/-

तर आपण असे म्हणू शकतोच कि, त्या व्यवसायामध्ये प्रत्येकाचा १/४ (एक चतुर्थांश) वाटा आहे याच वाटयाला “शेअर” म्हणतात.

म्हणजेच प्रत्येकाचा त्या व्यवसायामध्ये असलेला वाटा किंवा  मालकी हक्क. म्हणजेच आपण म्हणू शकतो “रिलायन्स कंपनी” चा एखादा “शेअर” तुम्ही विकत घेतला, तर तुम्ही त्यामध्ये वाटेकरी तर आहातच पण तिथे आपल्या गोष्टीप्रमाणे चार शेअर नाहीत. तिथे खूप शेअर्स आहेत आणि तुमच्याकडे त्यामधला एक हिस्सा (भाग) आहे. या “शेअर” ला “स्टॉक” असे देखील म्हणतात

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?|What is stock exchange?

स्टॉक एक्सचेंज हि फक्त एक सेकंडरी संस्था आहे. भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ती म्हणजे,

1.BSE = बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,

2.NSE = नॅशनल स्टॉक एक्सचेंज

आता आपण बघू हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय ?

समजा आपण ग्राहक आहे आणि आपण किराणा घ्यायला एका वाण्याच्या दुकानामध्ये जातो, तर ते वाण्याचं दुकान म्हणजे आपल्यासाठी स्टॉक एक्सचेंज होय. फरक फक्त एवढाच आहे, कि इकडे ग्राहक विक्रेत्याकडून थेट व्यवहार करून खरेदी करतो.

पण स्टॉक एक्सचेंज मध्ये मात्र अशा प्रकारे थेट व्यवहार होत नाहीत. तिथे माध्यमांची आवश्यकता असते, म्हणजेच तिथे ब्रोकर (दलाल) असतो. ज्याच्या करवी हा व्यवहार म्हणजेच शेअर्स ची देवाण-घेवाण शक्य होते.

आता, माझ्या मनामध्ये सहजच एक प्रश्न आला; त्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी शोधा, तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का करताय? याचं उत्तर शोधा आणि मला पण सांगा.

तर, मित्रांनो आता आपण शेअर म्हणजे काय? हे बघितले आहे, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय हे देखील बघितले . आता आपण पुढल्या लेखामध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय हे बघूया……

स्टॉक मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज यातील फरक सुद्धा बघूया………..

Leave a comment